महानगरपालिका कर्मचारी/ शिक्षकांसाठी व मनपा शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली रांगोळी स्पर्धा 2022-23 पारितोषिक वितरण संपन्न.
बृहन्मुंबई महानगरपालिका – शिक्षण विभाग
संगीत व कला अकादमी - कला विभाग
प्रेस नोट
महानगरपालिका कर्मचारी/ शिक्षकांसाठी व मनपा शालेय विद्यार्थ्यांसाठी
खुली रांगोळी स्पर्धा 2022-23 पारितोषिक वितरण संपन्न.
बृहन्मुंबई महानगरपालिका – शिक्षण विभागातील संगीत व कला अकादमी – कला विभागातर्फे मानगरपालिका कर्मचारी/ शिक्षक व मनपा शालेय विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन मंगळवार दि.11 ऑक्टोबर 2022 रोजी ना. म. जोशी मार्ग मनपा शालेय सभागृह, लोअर परेल (पूर्व) करण्यात आले होते.
सदर स्पर्धा तीन गटात अनुक्रमे मनपा कर्मचारी समकालिन गट, मनपा कर्मचारी पारंपारिक गट व विद्यार्थी गटात घेण्यात आली. या स्पर्धेस स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सदरील स्पर्धेचे परिक्षण विजय गोठणकर, सुचिता चापनेरकर व शुभदा पांचाळ यांनी केले.
विजेत्यांचे अभिनंदन करतांना शिक्षणाधिकारी Rajesh Kankal व Raju Tadvi यांनी मनपाचे विद्यार्थी हे शिक्षणाबरोबरच कलेतही पारंगत असून त्यांचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या रांगोळी मध्ये त्यांच्या शिक्षकांचे प्रतिबिंब दिसत असून गुरु शिष्याच्या अतूट नात्याची प्रचिती येत असल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी उपशिक्षणाधिकारी (मध्यवर्ती) सुजाता खरे व कला विभाग प्राचार्य दिनकर पवार हे उपस्थित होते. सदर रांगोळी प्रदर्शन दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यांत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
कार्यक्रमाचे नियोजन कला अकादमीचे सर्व निदेशक, केंद्रप्रमुख व उपकेंद्रप्रमुख यांनी केले.