बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन्मा.शिक्षणाधिकारी श्री राजू तडवी यांचे मनोगत
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शैक्षणिक ब्लॉगवर आपले सहर्ष स्वागत !
Covid-19 च्या काळात मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी You tube, zoom क्लास यांद्वारे दर्जेदार ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिक्षणगंगा प्रवाहीत ठेवण्यात बृहन्मुंबई महानगरपालिका नेहमीच अग्रेसर राहिली आहे.
नवीन शैक्षणिक धोरण (NEP-2020) च्या प्रभावी अंमलबजावणीची पायाभरणी करणे,बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रसिद्धी देणे, शैक्षणिक Videos, वर्कशीटस डिजिटल शैक्षणिक साहित्य इ. द्वारे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना उत्तमोत्तम अभ्यासपूरक साहित्य उपलब्ध करून देणे व बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभागाद्वारे वेळोवेळी पारित केली जाणारी परिपत्रके व संपूर्ण पारदर्शक सांख्यिकी माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने 'बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग ' या अधिकृत शैक्षणिक ब्लॉगची निर्मिती करण्यात येत आहे.हा ज्ञानयज्ञ असाच तेवत ठेवण्यासाठी संपूर्ण ब्लॉग निर्मिती समितीला हार्दिक शुभेच्छा !
धन्यवाद.