बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन्मा.शिक्षणाधिकारी श्री.राजेश कंकाळ यांचे मनोगत
सुस्वागतम् ! सुस्वागतम् ! सुस्वागतम् !
आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात
कालानुरूप अद्ययावत होणारे ज्ञानभंडार व माहितीचे स्त्रोत म्हणून 'बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचा अधिकृत शैक्षणिक ब्लॉग' सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी खुला करून देताना 'आनंदाच्या डोही, आनंदतरंग' या उक्तीप्रमाणे मन उल्हसित झाले आहे.
या शैक्षणिक ब्लॉगच्या माध्यमातून नित्य नव्याचा शोध घेणारी विविध दालने व शिक्षण विभागाचे अभिनव उपक्रम, मनोरंजक ज्ञानरचनावादी अभ्यासाचा खजिना, बृहमुंबई -मनपा व खाजगी शाळांची सांख्यिकी माहिती तसेच शासन परिपत्रके आणि बरेच काही सर्वांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे आपल्या मुंबापुरीच्या नावलौकिकाला साजेसा शिक्षणाचा दर्जा व अध्ययनस्तर उंचावण्यासाठी त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग
करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळणार आहे. ब्लॉग निर्मिती समिती व संपूर्ण शिक्षण विभागास अनंत शुभेच्छा व कौतुक !
धन्यवाद.