एक हात मदतीचा
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ट्रस्ट बुद्धविहार वरळी येथे आयोजित केलेल्या आदर्श शिक्षकांच्या सन्मान सोहळ्यात सहभागी होऊन कार्यक्रम संपल्यानंतर घरी जात असताना रस्त्याच्या कडेला टोपली विणणारी आजी दिसली. एवढ्या वयातही मेहनत करणाऱ्या आजीची काम करण्याची वृत्ती पाहून मन भारावून गेले . विचारपूस केली असता आजीची मुलगा आणि सुन दोघेही मृत्यु पावलेले असून आजीला दोन नातवंडे आहेत . मुलगी इ. ७ वीत तर मुलगा इ. १ लीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनपाच्या शाळेत शिकत आहेत . या दोन्ही मुलांच्या शिक्षणासाठी आजी टोपल्या विकण्याचं काम करत असल्याचे लक्षात आले. आजीला टोपलीची किंमत विचारली असता आजीने ४० रुपये किंमत सांगितली . परंतु आजीची मेहनत पाहून ५० रुपयाला एक याप्रमाणे सर्व टोपल्या विकत घेतल्या. मित्रांनो या जगात अनेक असे गोरगरीब लोक आहेत ते दिसले की कृपया त्यांना मदत करत जा . अशा अनेक आजींना आपण मदत करू शकतो
खरंच एक हात मदतीचा देऊयात.
आपला.
राजु तडवी
शिक्षणाधिकारी
बृहन्मुंबई महानगरपालिका