Type Here to Get Search Results !

Breaking News

बदली धोरण परिपत्रक तयार करण्यापूर्वी हरकती मागवण्याबाबत


Click here to open 👇👇👇👇

बदली धोरण परिपत्रक तयार करण्यापूर्वी हरकती मागवण्याबाबत 


©mybmcedu 









Post a Comment

5 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सन्मा.EORP विभाग
    बृ.म.न.पा. शिक्षणाधिकारी कार्यालय
    करी रोड, बृहन्मुंबई

    विषय-शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचार्यांच्या बदली धोरणाबाबत.

    अर्जदार: श्री. विजय जगदेव खंडारे, प्र.शि., जुहुगांधीग्राम MPS, K/West विभाग.

    संदर्भ- १)शासन निर्णय क्र.जिपब/४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४/दि.२७.०२.२०१७.
    संदर्भ क्र.२)आय ईओ/ओडी/२९८/दि.३०.०४.२०१९ .

    मा.महोदय/महोदया,
    उपरोक्त दोन्ही संदर्भांवाये अवघड क्षेत्र ही संकल्पना दुर्गम भागासाठी लागू पडते. अवघड क्षेत्राची व्याख्या संदर्भ- १)शासन निर्णय क्र.जिपब/४८१७/प्र.क्र.७/आस्था-१४/दि.२७.०२.२०१७ यामध्ये दिलेली आहे.

    परंतु मुंबई हे महानगर असल्याकारणाने मूळचे मुंबईला वास्तव्यास राहणाऱ्या कर्मचार्यांना वगळून मुंबई बाहेरून रोजगारासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना मुंबईत घर घेणे परवडत नाही म्हणून सामन्यात: त्यांचे राहायचे ठिकाण लांब असते. साधारणत: काही कर्मचारी विरार, भायंदर, डहाणू, पालघर ,कल्याण अंबरनाथ, बदलापूर, पनवेल अशा लांब ठिकाणी राहतात. यामुळे शाळेचे(कामाचे) ठिकाण हे लांब असते.
    इथे अवघड क्षेत्र ही संकल्पना रद्द करणे न्यायोचित नाही. कारण जरीही सर्व ठिकाणी लोकल व बसची सुविधा उपलब्ध असली तरी मुंबईतील बस व लोकलला असलेली गर्दी , हल्ली AC लोकल सुरु असल्यामुळे आणखी वाढणारी लोकलची गर्दी आणि रस्त्यावरील होणारी वाहनांची गर्दी त्यामुळे होणारे Traffic या सर्वांमुळे कर्मचारी घरापासून ते कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी त्याला बरीच कसरत रोज करावी लागते. ग्रामीण भागात हा असला प्रकार होत नाही.

    अवघड क्षेत्र ह्या संकल्पने अंतर्गत राहायचे ठिकाण व शाळेचे ठिकाण हे लांब असणे व तसा पत्ता पुरावा सादर केले असता त्यास मान्यता द्यावी.

    किंवा अवघड क्षेत्र ही संकल्पना रद्द करायचीच असेल तर राहायचे ठिकाण व शाळेचे(कामाचे) ठिकाण हे लांब असणे व तसा पत्ता पुरावा सादर करणे ही बाब बदली करतांना विचारात घ्यावी.

    सदर हरकत आपणांस सविनय सादर . मा.न. वि. व्हावे.

    आपला नम्र
    (श्री.विजय जगदेव खंडारे)

    ReplyDelete
  2. बृहन्मुंबई महानगरपालिका मागासवर्गीय शिक्षक कर्मचारी संघ
    प्रति,
    सन्मा. शिक्षणाधिकारी,
    बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग,
    मुंबई. यांस -
    विषय : शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाबाबत.
    महोदय,
    बृहन्मुंबई मनपा शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणाबाबत तयार केलेल्या प्रारुपाबाबत पुढीलप्रमाणे हरकती नोंदवण्यात येत आहेत.
    1. मुंबई महानगरपालिका ही स्वायत्त संस्था असून मुंबई क्षेत्राच्या भौगोलिक, सामाजिक व एकूणच मुंबई क्षेत्राचा वेगळा विचार होणे अपेक्षित असताना महाराष्ट्र शासन निर्णय जसेच्या तसे लागू करणे उचित होत नाहीत.
    2. सदर प्रारूप तयार करताना अवघड क्षेत्र ठरविणे जिकीरीचे आहे, तरी प्रवासाची साधने उपलब्ध आहेत म्हणून अवघड क्षेत्र हा भाग काढून टाकणे उचित नाही. प्रवासाचे सर्वात प्रभावी व स्वस्त साधन याचा विचार करता रेल्वे व त्यानंतर बस, रिक्षा व इतर साधने वापरताना होण्याऱ्या खर्चाचा व वेळेचा विचार यांत अभिप्रेत आहे. सदर विचार या प्रारुपात दुर्लक्षित आहे.
    3. सदर प्रारूप ठरवताना केवळ मागचाच संदर्भ न घेता धोरणात्मक निर्णय घेताना सर्वच पातळीवरील जबाबदार प्रतिनिधी व सर्व युनियन प्रतिनिधींच्या समवेत चर्चासत्र होणे अपेक्षित आहे. ही लोकशाहीची गरज आहे. तरी याबाबत रचना व्हावी, ही विनंती.
    4. विशेष संवर्गातील भाग 1 मध्ये अपंग (मतिमंद) मुलांचे पालक हा मुद्दा समाविष्ट करण्यात यावा.
    5. बदली विशेष संवर्गातील भाग 1 मधील कर्मचाऱ्यांचे वय 53 वर्षे हेच उचित आहे.
    6. मराठी माध्यमातील 20% व MPS मधील 30% रिक्त जागा ठेवणे हा निर्णय बदली धोरणाशी निगडीत असल्याने सदर प्रारूप ठरविण्यात कुठल्याही प्रकारे घाई न करता कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, शाळेच्या गुणवत्तेवर व शालेय प्रशासनावर परिणाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. करिता अभ्यासपूर्वक चर्चा होणे अपेक्षित आहे.
    7. मागील काही वर्षांत बदली प्रक्रिया राबविली गेली नाही, परिणामी ज्यांना विशिष्ट कारणांमुळे बदली हवी आहे त्यांना बदली देण्यात यावी. (जसे पूर्वेकडील कर्मचारी पश्चिम भागात अनेक वर्षांपासून कार्यरत आहे, विशेष संवर्ग, इ.)
    8. मुद्दा 3 मधील बदलीपात्र कर्मचाऱ्यांसाठी पसंतीक्रम : पसंतीक्रम देण्यास झोनचे बंधन नसावे. तीनही झोन मधील किमान 5 शाळांचे बंधन हा भाग वगळण्यात यावा.
    9. मराठी माध्यमात नवीन भरती नाही. परिणामी बहुतांशी कर्मचारी सेवानिवृतीच्या जवळ आलेले आहेत. तसेच विविध कारणांमुळे स्वेच्छा सेवानिवृत्तीचे प्रमाणही वाढले आहे. करीता मराठी माध्यमासाठी सदर प्रारुपात विशेष प्रावधान समाविष्ट करण्यात यावे.
    10. बदली प्रक्रियेतील टक्केवारीचे प्रमाण माध्यमनिहाय ठरविण्यात यावे.
    तरी वरील विनंती सूचनांचा व हरकतींचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, ही नम्र विनंती.
    कळावे.
    आपला नम्र,


    दिनेश अंकुश
    सरचिटणीस

    ReplyDelete
  3. क्र. 3669 - दि. 10/11/2022
    सन्मा. EORP विभाग
    बृहन्मुंबई महानगरपालिका
    मुंबई

    महोदय,
    उपरोक्त विषयानुसार शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणावर बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभेतर्फे खालील प्रमाणे सूचना/हरकती पाठवित आहोत -

    1. एकाच शाळेत 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचारी बदलीसाठी पात्र असतील.
    2. परिपत्रक क्र. आयईओ/ओडी/298 - दि. 26/12/2017 मध्ये नमूद केलेल्या धोरणानुसार वयाची 53 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा संवर्ग-1 मध्ये समावेश करण्यात यावा.
    3. विशेष संवर्ग कर्मचारी भाग -1 - ज्या कर्मचाऱ्यांचे पाल्य अपंग (दिव्यांग) आहेत अशा शिक्षकांचाही विशेष संवर्ग भाग-1 मध्ये समाविष्ट करावे. (महाराष्ट्र शासन निर्णय क्र. जीपब/प्र.क.ब. 4820/प्र.क्र.290/आस्था-14 - दि. 7/04/2021 च्या शिक्षक/मुख्या बदली धोरणामध्ये सुद्धा दिव्यांग मुलांच्या पालकांना विशेष संवर्गात गृहित धरले आहे.)
    4. आपापसात बदली करताना ‘एकाच विभागात बदली न करण्याची अट’ शिथिल करण्यात यावी.
    5. बदली पात्र कर्मचाऱ्यांसाठी पसंतीक्रम देताना तीन झोन मधील प्रत्येकी किमान 5 शाळा देण्याची अट शिथिल करण्यात यावी.
    6. बदलीची प्रक्रिया ही तीन स्तरांवर राबविण्यात यावी. अगोदर विभाग स्तरावर, नंतर परिमंडळ स्तरावर आणि नंतर संपूर्ण मुंबई शहर असे स्तर ठरविण्यात यावे.
    7. पदवीधर आणि अपदवीधर शिक्षक संख्या निश्चित करावी आणि त्यानुसारच बदली प्रक्रिया राबवावी.
    8. इयत्ता 6वी ते 8वी च्या वर्गात भाषा, समाजशास्त्र आणि गणित, विज्ञान या विषयानुरुप शिक्षकांची बदली करण्यात यावी.

    विशेष परिस्थिती निकष -
    पी/दक्षिण विभागातील आरे मिल्क कॉलनी मधील महापालिका शाळांची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सकाळी 7 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 5.30 नंतर या वनविभागात हिंस्र पशुंचा मुक्त वावर असल्यामुळे तिथे वावरणे अत्यंत धोकादायक आहे. अशा परिस्थितीत या परिसरातील शाळांसाठी वेगळे निकष असायला हवे.

    पी/उत्तर विभागातील मनोरी मनपा शाळेमध्ये पोहोचण्याकरीता बोटीचा वापर करावा लागतो. ही परिस्थिती अवघड परिस्थिती म्हणून गृहित धरण्यात यावी.
    वरील दोन्ही शाळांसाठी पूर्वी वेळेची विषेश सवलत होती. परंतु बायोमेट्रीक हजेरी सुरु झाल्यापासून ही सवलत बंद झाली. तरी सदरच्या दोन शाळांसाठी विशेष सवलत पूर्वीप्रमाणे सुरु करण्यात यावी.

    तरी आपण शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरण तयार करताना वरील सूचनंचा विचार करावा ही विनंती.

    आपला नम्र,
    शरद कुमार सिंह
    सरचिटणीस, बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभा
    युनियन कोड क्र. 19

    ReplyDelete
  4. प्रति,
    मा. शिक्षणाधिकारी महोदय,
    शिक्षणाधिकारी कार्यालय,
    त्रिवेणी सदन करी रोड मुंबई.
    विषय:- बदली धोरण बाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याबाबत.
    महोदय,
    बदली धोरण बाबत माझ्या सूचना मी इथे मांडत आहे. (१) *अवघड क्षेत्र ही संकल्पना रद्द करु नये* . मुंबई मनपाच्या कार्यक्षेत्रातील फक्त २३ शाळा अवघड क्षेत्रात आहेत. जरी प्रवासाची साधने उपलब्ध आहे तरी या शाळांपर्यंत जायला लागणारा वेळ खूप जास्त आहे. त्यामुळे अवघड क्षेत्र ही संकल्पना रद्द करु नये. (२) वर्गनिश्चिती करताना इयत्ता १ ली ते ५ वी व ६वी ते ८वी हे फक्त दोनच प्रकार करण्यात आले आहे. वास्तविक मुंबई मनपाच्या ९५% शाळा ह्या १ ली ते ८ वी म्हणजेच संयुक्त शाळा आहेत. *त्यामुळे मसुद्यात (अ) इयत्ता १ ली ते ५ वी, (ब) इयत्ता ५ वी ते ६ वी व (क) इयत्ता १ ली ते ८ वी ( संयुक्त शाळा ) असे एकुण तीन प्रकार करण्यात यावेत* . राज्य शासनाने सुद्धा तीनच प्रकार केलेले आहेत. (३) इयत्ता १ ली ते ५ वी मध्ये विद्यार्थी संख्या १५० पर्यंत असेल तर ( ३०च्या पटीत) ५ शिक्षक आहेत. परंतू विद्यार्थी संख्या १५० ते २०० असल्यास सुद्धा ५ शिक्षक व १ मुख्याध्यापक असे म्हटले आहे. राज्य शासनाच्या शाळेत मुख्याध्यापक यांना वर्ग असतात. आपल्याकडे संयुक्त शाळा असल्यामुळे तसेच कामाचा व्याप जास्त असल्यामुळे मुख्याध्यापक वर्ग घेऊ शकत नाहीत त्यामुळे *विद्यार्थी संख्या १५० ते २०० पर्यंत असल्यास ६ शिक्षक व १ मुख्याध्यापक अशी स्पष्ट तरतूद करावी.* यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थी संख्या २०० पेक्षा जास्त असल्यास शिक्षक: विद्यार्थी प्रमाण हे १:४० असे आहे. काही अधिकारी या वाक्याचा चुकीचा अर्थ काढतात आणि पटसंख्या २०० च्या पुढे गेल्यावर २०० च्या पूढील पटसंख्येला १:४० असे निकष न लावता सरळसरळ संपूर्ण पटसंख्येला ४० चे निकष लावून शिक्षक संख्या गृहीत धरतात. हे चुकीचे आहे त्यामुळे *२०० च्या पूढील पटसंख्येलाच १:४० हे निकष लागू असतील असा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा* . (४) *शिक्षकांना बदलीस पात्र ठरवताना एका शाळेत किमान ३ वर्षे* पूर्ण झाली पाहिजेत असा उल्लेख आहे परंतु *ही मर्यादा ५ वर्षे करण्यात यावीत. कारण एखाद्या उपक्रमशील शिक्षकाला त्या शाळेत काही प्रयोग करण्यासाठी, गुणवत्ता सुधारण्यासाठी ३ वर्षे हा कालावधी खूप कमी होतो. त्यामुळे हा कालावधी ५ वर्षे करण्यात यावा* . (५) दरवर्षी *बदल्यांचे प्रमाण २०% ऐवजी ३०%* करण्यात यावे. (६) बदलीस पात्र कर्मचाऱ्यांनी पसंतीक्रम देताना तीनही झोन मधील प्रत्येकी किमान ५ शाळा देणे बंधनकारक केले आहे. ही *अत्यंत अन्यायकारक जाचक असलेली अट सरळसरळ रद्दच करण्यात यावी* . *कर्मचाऱ्यांना पसंतीक्रम देताना कोणत्याही शाळेचे नाव देण्याची मुभा असावी* . (७) विशेष संवर्ग भाग १ मधील कर्मचाऱ्यांना बदली नाकारण्याचे अधिकार दिले आहेत. जर *प्रशासन स्वतच मुंबई मध्ये प्रवासाची साधने उपलब्ध आहेत* असे म्हणतो तर या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सुद्धा बदल्या ह्या झाल्याच पाहिजेत.‌ *किमान १० वर्षे एकाच शाळेत पुर्ण झाल्यानंतर तरी त्यांची बदली जवळपासच्या शाळेत करण्यात यावी* . पण कोणत्याही परिस्थितीत त्यांना एकाच शाळेत ठेवू नये. *कारण काही कर्मचारी ह्या तरतुदींचा गैरवापर करून शाळेतील इतर कर्मचाऱ्यांना त्रास देतात* . (८) सर्वात महत्वाचे म्हणजे *बदली प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सर्व विभाग निरिक्षक, प्रशासकीय अधिकारी, अधिक्षक, उपशिक्षणाधिकारी यांचे बदली प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. यात परिपत्रकातील सर्व मुद्यांवर सविस्तर स्पष्टीकरण करण्यात यावे* . कारण काही अधिकारी परिपत्रक स्पष्ट असतानांही आपल्या मनाप्रमाणे वेगवेगळे अर्थ लावतात. (९) *बदल्या ह्या नियमितपणे दरवर्षी करण्यात याव्यात* .
    धन्यवाद.
    श्री. उमेश भोयर
    प्र.शिक्षक
    अभ्युदय नगर मनपा हिंदी शाळा.

    ReplyDelete
  5. प्रति,
    मा. शिक्षणाधिकारी महोदय,
    शिक्षणाधिकारी कार्यालय,
    त्रिवेणी सदन करी रोड मुंबई.
    विषय:- बदली धोरण बाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्याबाबत.
    महोदय,
    बदली धोरण बाबत माझ्या सूचना मी इथे मांडत आहे.
    1.बदल्यांचे अधिकार प्राप्त कर्मचारी व बदली पात्र कर्मचारी यांना दहा वर्षाची सेवेची अट असल्यामुळे यांच्यातील फरक स्पष्ट होत नाही.
    2.पती - पत्नी एकत्रिकरणात वेगवेगळ्या रेल्वे मार्गा ची अट लावण्यात येऊ नये. कारण काही शाळा रेल्वे मार्गा पासून दूर आहेत आणि तेथे पोहोचण्यासाठी बस किंवा इतर माध्यांनी प्रवास करणे अपेक्षित आहे.
    3. प्रत्येक परिमंडळातील पाच शाळेची नावे देण्याची आट रद्द करण्यात यावी.
    4. बदल्यातील प्रत्येक टप्प्यानंतर सुधारित रिक्त जागांची एकत्रित यादी जाहीर करण्यात यावी व शिक्षकांना त्यांच्या पसंती क्रम भरण्यासाठी वेळ देण्यात यावा त्यानंतर बदली करण्यात याव्यात.
    तरी आपण शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदली धोरण तयार करताना वरील सूचनंचा विचार करावा ही विनंती.

    मोहम्मद अकबर मोहम्मद दस्तगीर
    प्र. शिक्षक कुरार गाव मनपा उर्दू शाळा.

    ReplyDelete